Dr. Vithal Lahane holds the highest degree in the medical field, M.Ch. in Plastic Surgery, from Grant Medical College and J.J. Group of Hospitals, Mumbai. He chose Latur for his practice for two main reasons: firstly, to stay close to his parents, and secondly, to change the misconception that plastic surgery is only for the rich. His goal was to make plastic surgery accessible to the common man and the poor. Over the last 22 years, he has successfully fulfilled this objective, finding immense joy and satisfaction in his work. While leaving Mumbai in March 2000, he took blessings from his elder brother Padmashri Dr. Tatyarao Lahane and his mentor Dr. B.M. Davar, promising to serve patients with 100% honesty and integrity. He has been serving patients for the past 22 years on these principles. This journey of service has been possible with the blessings of his spiritual guru Vai. H.B.P. Vithalprasad Maharaj Dharmapurikar. एम. सीएच. प्लास्टीक सर्जरी ही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदवी ग्रँट मेडीकल कॉलेज व जे. जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, मुंबई येथून संपादन केल्यानंतर प्रॅक्टीससाठी ‘लातूर’ ची निवड दोन कारणांसाठी केली. पहिले माय व अण्णा (आमचे आई-वडील) यांच्या जवळ राहता येईल आणि दुसरे म्हणजे प्लास्टीक सर्जरी ही श्रीमंतांचीच ब्रँच अशी जी संकल्पना आहे, ती बदलून सर्वसामान्यांनासुध्दा प्लास्टीक सर्जरी करून घेता यावी, ही बँच गरीबांपर्यंत घेऊन जाता यावी या उद्देशाने प्रॅक्टीससाठी लातूरची निवड करण्यात आली. गेल्या २२ वर्षात हे मुख्य उद्देश अत्यंत समाधानकारकपणे पूर्ण करू शकलो. यात खूप सुख, आनंद व समाधान मिळाले. मार्च २००० मध्ये मुंबई सोडताना माझे मोठे बंधु पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व माझे प्लास्टीक सर्जरीचे गुरु डॉ. बी. एम. डावर सर यांचे आशीर्वाद घेतले व त्यांना एक वचन दिले की, मी शंभर टक्के ईमानदारीने व प्रामाणिकपणे रुग्णसेवा करीन. मी माझ्या आयुष्यात असे काहीही करणार नाही ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. याच तत्वावर गेली २२ वर्ष रुग्णसेवा करत आहे. या २२ वर्षाच्या प्रवासात मी करत असलेली रुग्णसेवा माझे अध्यात्मिक गुरु वै. ह. भ. प. विठ्ठलप्रसाद महाराज धर्मापुरीकर यांच्या आशिर्वादाने, माय व अण्णा यांच्या पुण्याईने...
22+ Years २२+ वर्षे
Affiliation संलग्नLahane Hospital, Latur लहाने हॉस्पिटल, लातूर
Smile Train credentialed partner with over 11,000 free cleft surgeries. Regularly conducts free and low-cost surgical camps for rural and underserved patients. स्माईल ट्रेन अधिकृत भागीदार, ज्यांनी ११,००० हून अधिक मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. ग्रामीण आणि गरजू रुग्णांसाठी नियमितपणे मोफत आणि अल्पदरात शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित करतात.
Corrective surgeries for children and adults. लहान मुले आणि प्रौढांसाठी सुधारणा शस्त्रक्रिया.
Restoring form and function. शरीराची रचना आणि कार्य पूर्ववत करणे.
Care for burn injuries and scars. जळण्याच्या जखमा आणि डागांवर उपचार.
Aesthetic enhancement procedures. सौंदर्य वाढवणारी शस्त्रक्रिया.
Correction of facial irregularities. चेहऱ्यावरील अनियमितता सुधारणे.
Visit Lahane Hospital for a professional consultation. व्यावसायिक सल्ल्यासाठी लहाने हॉस्पिटलला भेट द्या.